| Sarkarnama

औरंगाबादमध्ये योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मे 2017

औरंगाबाद : उत्तरप्रदेशात सहारनपुरमध्ये दलितांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार, हत्याकांड, जाळपोळीचा निषेध करत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (पीआरएसपी) ने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा रविवारी औरंगाबादेतील क्रांती चौकात जाळला. 

सहारनपुर येथे मागील काही दिवसांपासून दलित समाजावर अत्याचार झाला आहे. यामध्ये अनेकांचे घरे जाळण्यात आली. काही जणांचे खून झाले. यामध्ये दलित समाजातील अनेक लोक बेघर झाले आहे. याचा निषेध करत बीआरएसपी ने निदर्शने करून योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, राज हिरे, राहुल भिंगारे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

संबंधित लेख