भाजप 2019 ला विरोधी बाकावर बसलेला दिसेल : शेट्टी

भाजप 2019 ला विरोधी बाकावर बसलेला दिसेल : शेट्टी

कराड - केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या विऱोधातील आहे. मी कमळ औषधालाही ठेवणार नाही असे मी जाहीर केले होते. त्याला शेतकऱ्यांची साथ मिळत आहे. 2019 नंतर भाजप हा विरोधी बाकावर अतिशय छोट्या गटात बसलेला दिसेल, अशी टिका खासदार राजु शेट्टी यांनी आज कालच्या मोदि सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या प्रश्नावर केली. 

दुध आंदोलनानंतर पहिल्यांदाच ते कऱ्हाड (जि.सातारा) येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध विक्री करायची नाही हा निर्धार घेवुन दुध घरातच ठेवले. सरकारने, दुध संस्थांनी जंगजंग पछाडले तरीही त्यांना दुध दिले नाही. त्याचा परिणाम राज्यातील दररोज 1 कोटी 40 लाख लिटर दुध संकलनापैकी 1 कोटी 20 लाख एवढे संकलन झाले नाही. त्यामुळे मोठ्या शहरात तिसऱ्या दिवसापासुनच दुधाची टंचाई जाणवु लागली. शेतकऱ्यांनीही दुध आंदोलन आपल्या हातात घेतले. हा लोकसहभाग बघितल्यावर राजकीय पक्ष, संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

काहींनी दुध रस्त्यावर ओतुन राजु शेट्टींनी काय साध्य केले अशी माझ्यावर टीका झाली. मात्र शेतकऱ्यांनी जसे रस्त्यावर दुध टाकले तसे गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना वाटले आहे. 1 कोटी 35 लाख लिटर दुध हे शेतकऱ्यांनी चांगल्या कामासाठी वापरले आहे. हेही लक्षात घ्या. भ्रष्ट झालेल्या पैशाला शेतकऱ्यांनी दुधाची आंघोळ घालुन पवित्र केले आहे. त्यामुळे दुध ओदोलनाचे यश हे ऐतिहासिकच आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com