| Sarkarnama

ऊर्जामंत्र्यांच्या जनता दरबारामुळे अधिकाऱ्यांची झोप उडाली

संदीप खांडगेपाटील
शनिवार, 6 मे 2017

मुंबई : राज्याचे ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यात त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबारामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या थेट भेट अभियानात शेतकऱ्यांना व अन्य वीज ग्राहकांना थेट तक्रारी मांडता येणे शक्‍य झाल्यामुळे ऊर्जा विभागाच्या समस्यांचा पंचनामा थेट मंत्र्यांसमोर होवू लागल्याने अधिकारी अडचणीत येवू लागले आहेत. 

22 एप्रिलपासून ऊर्जांमंत्री बावनकुळे यांनी राज्याचा ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. बावनकुळे यांनी पुणे, अहमदनगर, यवतमाळ, बुलढाणा आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यात भेटी दिल्या असून या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांचे जनता दरबारही झाले आहेत. या जनता दरबारात पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

या जनता दरबारामध्ये ऊर्जा खात्याचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित असतात. या जनता दरबारात शेतकरी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने येवून आपल्या समस्या मांडत आहेत. या समस्यांबाबत ऊर्जामंत्री अधिकाऱ्यांकडे विचारणा करत असल्याने उत्तरे देताना अधिकाऱ्यांची धांदल उडत आहे. 

17,18 व 19 मे रोजी बावनकुळे हिंगोली, वाशिम, अकोला या ठिकाणी भेट देणार असून याठिकाणीही त्यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात जनता दरबाराचे नियोजन व स्थानिक भागातील आमदारांनी वीज विभागाशी संबंधित केलेल्या कार्यक्रमांचे भूमीपुजन अशी दुहेरी भूमिका बावनकुळे पार पाडणार आहेत.

पुणे, अहमदनगर, यवतमाळ, बुलढाणा आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यात झालेल्या ऊर्जा मंत्र्यांच्या जनता दरबारात शेतकऱ्यांच्या काही समस्यांचे निवारण झाले असून अन्य समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

संबंधित लेख