100 sitting and ex corporaters fighting election | Sarkarnama

परभणीत शंभरावर आजी - माजी नगरसेवकांची कसोटी

गणेश पांडे
मंगळवार, 11 एप्रिल 2017

दोन माजी महापौर मात्र रिंगणाबाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे पती आणि पत्नी किंवा मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठीच प्राधान्य देण्यात आले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांला मात्र तिकिट मिळविण्यासाठी चांगलेच झगडावे लागले आहे. 

परभणी : महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जवळपास शंभर आजी-माजी नगरसेवकांनी उडी घेतली असून त्यात अनेकांची कसोटी पणाला लागली आहे.

विद्यमान ६६ नगरसेवक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या रिंगणात असून माजी नगरसेवकांसह दोन माजी नगराध्यक्ष देखील आपले नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर दोन महापौर मात्र रिंगणाबाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे पती आणि पत्नी किंवा मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठीच प्राधान्य देण्यात आले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांला मात्र तिकिट मिळविण्यासाठी चांगलेच झगडावे लागले आहे. 

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या प्रमुख चारही पक्षांसह छोटे-मोठे पक्ष देखील स्वतंत्र निवडणुकीत उतरल्यामुळे विद्यमानांसह माजी नगरसेवकांना तिकिटासाठी फारसे झगडावे लागले नाही. पक्ष बदलला तरीही कुणा न कुणा पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. अपवाद वगळता बहुतांशांना तिकीट मिळाले तर काही विद्यमान नगरसेवकांनी स्वतः होऊन माघार घेतली आहे. 

विद्यमान ४० नगरसेवक थेट रणांगणात 

विद्यमान नगरसेवक गणेश देशमुख (प्रभाग एक), आशाताई नर्सीकर (प्रभाग एक), चांद सुभाना जाकेर अहेमदखान (प्रभाग दोन), अमरिका बेगम अ. समद (प्रभाग दोन), अनिता रवींद्र सोनकांबळे (प्रभाग तीन), माजीद जहागीरदार (प्रभाग तीन), अतुल सरोदे (प्रभाग चार), विजया कनले (प्रभाग चार), वनमाला देशमुख (प्रभाग चार), सचिन देशमुख (प्रभाग पाच), शिवाजी भरोसे (प्रभाग पाच), विजय धरणे (प्रभाग सहा), सुरैय्या बी शेख मोईन (प्रभाग सहा), सुनील देशमुख (प्रभाग सात), गुलमीरखान (प्रभाग सात), रजिया बेगम म. युनूस (प्रभाग सात),अमीनाबीबी शेख नबी (प्रभाग सात), रजिया बेगम म. युनूस (प्रभाग सात), सय्यद समी स.साहेबजान (प्रभाग आठ), खान मुनसीफ नय्यर विखारखान (प्रभाग आठ), सचिन अंबीलवादे (प्रभाग नऊ), अंबिका डहाळे (प्रभाग नऊ), भगवान वाघमारे (प्रभाग नऊ), दिलीप ठाकूर (प्रभाग नऊ), नवनीत पाचपोर (प्रभाग नऊ), संगीता कलमे (प्रभाग दहा), बालासाहेब बुलबुले (प्रभाग दहा), विजय जामकर (प्रभाग दहा), संगीता दुधगावकर (प्रभाग दहा), राम गुजर (प्रभाग १२), रुखसाना बेगम रौफखान (प्रभाग १२), सचिन कांबळे (प्रभाग १३), महमदी बेगम अहेमदखान (प्रभाग १३), अखिल तरन्नुम परवीन (प्रभाग १४), शेख अमीना बी शेख चुन्नू (प्रभाग १४), काझी मुखीमोद्दीन मोईनोद्दीन काझी (प्रभाग १४), अश्विनी वाकोडकर (प्रभाग १५), डाॅ. विवेक नावंदर (प्रभाग १५), स्वाती खताळ (प्रभाग १६), श्याम खोबे (प्रभाग १६) यांचा त्यामध्ये समावेश आहे. 

अप्रत्यक्षरित्या रिंगणातील विद्यमान 
महापौर संगीता वडकर यांच्या एेवजी त्यांचे पती राजेंद्र वडकर (प्रभाग १५), रहिमाबी शेख महेबूब यांचा मुलगा शेख महेबूब (प्रभाग सहा), गोविंद पारटकर यांचे बंधू एकनाथ पारटकर (प्रभाग सात), तिरुमला खिल्लारे यांचे पती मोकिंदा खिल्लारे (प्रभाग एक), शांताबाई लंगोटे यांचे चिरंजीव विकास लंगोटे (प्रभाग १३), शेख अहेमद यांच्या पत्नी समिना बी (प्रभाग १४), श्रीमती बद्रुन्नीसा बेगम यांच्या नातेवाईक सनिहा बेगम हसन (प्रभाग आठ), विश्वजित बुधवंत यांच्या वहिनी माधुरी बुधवंत (प्रभाग चार), अर्चना नगरसाळे यांचे पती सतीश नगरसाळे (प्रभाग पाच), मीराताई शिंदे यांचे पती वसंत शिंदे (प्रभाग १५), आशाताई वायवळ यांचे पती भीमराव वायवळ (प्रभाग १२), श्रीमती कस्तुराबाई कांबळे यांचे चिंरजीव सुशील कांबळे मानखेडकर (प्रभाग १६), श्रीमती रेखा कानडे यांचे नातेवाईक अनिल बाबूराव कानडे (प्रभाग १२), व्यंकट डहाळे यांच्या मातोश्री श्रीमती यमुनाबाई डहाळे (प्रभाग एक) आदी नगरसेवक कुटुंबातील अन्य सदस्यांच्या माध्यमातून रिंगणात उतरले आहेत. 

निवडणुकीतून माघार
महापालिकेचे पहिले महापौर प्रताप देशमुख हे स्वतः होऊन ही निवडणूक लढविणार नाहीत. त्याच बरोबर श्रीमती सईदाबेगम इफ्तखारोद्दीन, संगीता मुळे, शारदाबाई मोरे, अब्दुल फातेमा अब्दुल जावेद, अॅड. जावेद कादर, हासीबूर रहेमानखान, अब्दुल मेहराज कुरेशी, आकाश लहाने, सुदामती थोरात, महेश फड, राजश्री जावळे, उदय देशमुख, नदीम इनामदार हे उमेदवार रिंगणात नाहीत. काहींनी उमेदवारीच दाखल केली नाही तर काहींनी पक्षांतर्गत वाद, तडजोडीनंतर माघार घेतली. 

महापौर बाहेर 
या निवडणुकीत महापालिकेचे दोनही माजी महापौर प्रताप देशमुख, संगीता वडकर रिंगणात हे दोघे नाहीत. तर माजी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री खोबे (प्रभाग १६), सय्यद महेबूब अली पाशा (प्रभाग १४) यांच्यासह माजी नगरसेवक मोकिंदा खिल्लारे, पांडुरंग देशमुख, विमल पांडे, लक्ष्मी बबन मकासरे, प्रशास ठाकूर, कीर्ती लाठकर, राजेश सोनवणे, सुभद्राबाई वाघमारे, अब्दुल कलीम अब्दुल समद, वसंत मुरकुटे, रफतअली खान, शंकर नाईकनवरे, नागेश सोनपसारे, दुर्गा अर्जुन कल्याणकर, कमलबाई नागनाथ काकडे, खमीसा गुलाम मोहंमद महंमद हुसेन, खमीसा जान मोहंमद हुसेन, मोहंमद जलालोद्दीन इमामोद्दीन, अनिल मुदगलकर, राजेंद्र वडकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, बबन नेटके, श्रीमती यमुनाबाई डहाळे, प्रभावती राऊत, शेख खाजा शेख महेबूब, मोहंमद नईम महमंद यासीन हे माजी नगरसेवक देखील रिंगणात असून काहींचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. 
 

संबंधित लेख