पालघरमध्ये 11 वाजेपर्यंत जेमतेम 10 टक्के मतदान 

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सकाळी 7 वा मतदान सुरु झालं असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत जेमतेम 10 टक्के मतदान झाले होते.
पालघरमध्ये 11 वाजेपर्यंत जेमतेम 10 टक्के मतदान 

पालघर - भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सकाळी 7 वा मतदान सुरु झालं असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत जेमतेम 10 टक्के मतदान झाले होते.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ लाख २४ हजार मतदार आहेत. त्यातले चार लाख २९ हजार मतदार हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात सामना आहे. काँग्रेस व माकपचे उमेदवार रिंगणात आहेत. 

या निवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. श्रीनिवास वनगा यांनी तलासरी तालुक्यात कवाडा गावात कुटुंबीयांसह जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला लासरीतल्या कवाडा-ठाकरपाड्याच्या जिल्हापरिषद शाळेत वनगा यांच्या कुटुंबियांनी मतदान केले. यावेळी वनगा कुटुंबियांना चिंतामण वनगा यांच्या आठवणींनी भरून आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com