1 december black day obc leader kokare says | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास 1 डिसेंबरला जल्लोष नव्हे काळा दिन : कोकरे 

संपत देवगिरे 
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

नाशिक : मराठा आरक्षणाविषयी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, त्यावर पंचवीस मिनीटांत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया ही राज्य शासनाची पुर्वनियोजित फसवा फसवी आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 1 डिसेंबरला जल्लोष नव्हे तर ओबीसी संघटना "काळा दिन' पाळतील असा इशारा ओबीसी संघटनेचे संजय कोकरे यांनी दिला. 

कोकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ओबीसी संघटनेची नाशिकला बैठक झाली. त्यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. उद्या (ता. 19) त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात ते म्हणाले, मागासवर्ग आयोग स्वायत्त आहे. मात्र त्यांना लवकर अहवाल द्यावा असा दबाव शासनाने आणला. हा गोपनीय अहवाल मुख्य सचिवांना सादर केल्यावर अवघ्या पंचवीस मिनीटांत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत घोषणा केली. 

1 डिसेंबरला जल्लोष करा असे सांगीतले. हे सर्व राज्य सरकारचे पुर्वनियोजीत नाट्य आहे. त्यांना मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यायचेच नसावे. कारण हे सर्व न्यायालयात टिकणारे नाही. अन्यथा त्यांनी आधी सर्व घटकांना विश्‍वासात घेतले असते.

तसे झालेले नाही. कारण मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक वाढवावी लागेल. तो प्रश्‍न केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. सध्याच्या सत्तावीस टक्‍क्‍यांच्या ओबीसी कोट्यातुन आरक्षण दिल्यास 1 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात तसा जल्लोष नव्हे तर ओबीसी संघटना "काळा दिन' पाळतील.  

संबंधित लेख