भ्रष्टाचाराच्या संधी संपविल्याचा मुरलीधऱ मोहोळांचा दावा | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

भ्रष्टाचाराच्या संधी संपविल्याचा मुरलीधऱ मोहोळांचा दावा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पुणे : पुण्यातील चोवीस तास पाणीपुरवठ्याचे टेंडर अधिक एक हजार कोटींच्या रकमेने गाजले.  स्मार्ट सिटीच्या कामाबाबत वाद झाले. तरीही पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आपला कारभार पारदर्शक होता, असा दावा करत पालिकेतील भ्रष्टाचाराच्या संधी संपविल्याचा डंका पिटला आहे.

मोहोळ यांची कारकिर्द संपली आहे. त्यांनी आपल्या कामगिरीचा लेखा जोखा सोशल मिडियामध्ये मांडला आहे.  स्थायी समितीचा निर्णय़ कोणत्याही वादात अडकला नसल्याचे त्यांनी यात आवर्जून सांगितले आहे.   

पुणे : पुण्यातील चोवीस तास पाणीपुरवठ्याचे टेंडर अधिक एक हजार कोटींच्या रकमेने गाजले.  स्मार्ट सिटीच्या कामाबाबत वाद झाले. तरीही पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आपला कारभार पारदर्शक होता, असा दावा करत पालिकेतील भ्रष्टाचाराच्या संधी संपविल्याचा डंका पिटला आहे.

मोहोळ यांची कारकिर्द संपली आहे. त्यांनी आपल्या कामगिरीचा लेखा जोखा सोशल मिडियामध्ये मांडला आहे.  स्थायी समितीचा निर्णय़ कोणत्याही वादात अडकला नसल्याचे त्यांनी यात आवर्जून सांगितले आहे.   

पुण्याच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीला निर्विवाद सत्ता मिळाल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी मला दिल्याबद्दल पक्ष, पक्षाचे नेते, पदाधिकारी यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. मात्र त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेण्याचे टाळले आहे. पालकमंत्री गिरीश बापट किंवा खासदार संजय काकडे यापैकी कोणत्याही गटाचा आपला संबंध नसल्याचे तर मोहोळ यांनी यातून दाखविले नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. 

कारकिर्दीत शिवसृष्टी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला हा माझ्यासाठी सर्वाधिक भाग्याचा क्षण होता. आर्थिक कारभार करीत असताना तो पारदर्शी, शहराच्या दीर्घकालीन हिताचा आणि स्वच्छ राहावा, हे सूत्र मी ठेवले होते. स्थायी समितीचा कोणताही निर्णय वादात अडकला नाही. याचे कारण वरील सूत्र कृतीतूनही राबविले गेले, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

शहराच्या विकासाला केंद्र व राज्य सरकारने दिलेली दिशा निश्‍चित करीत मी दोन्ही वर्षी अंदाजपत्रक मांडले. स्मार्ट सिटी, मेट्रो, नदी सुधारणा या योजनांना बळ देणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी एचसीएमटीआर मार्ग, उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर इत्यादींचे जाळे अधिक भक्कम करणे, घनकचर्‍याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, त्यापासून ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य ठेवणारे प्रकल्प हाती घेणे, शहरात पीएमपीएमएलच्या ताफ्यात मिडी बसेस आणि सीएनजीवर चालणार्‍या बसेसचा समावेश करणे, समान पाणीपुरवठा व्हावा, पाण्याचा अपव्यय टळावा, या दृष्टीने २४ x ७ पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे, शहरातील वारसास्थळांचे संवर्धन आणि प्रेरणास्थळांची उभारणी करणे, उद्यानांची निगा राखणे, मिळकतकर धारकांचा विमा उतरविणे, अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी भर दिलेला आहे, असे त्यांनी यात नमूद केले आहे.

शहराचा कारभार पारदर्शी व्हावा, यासाठी सर्व शासकीय खरेदी GeM पोर्टलवरूनच करणे अनिवार्य करण्यात आले. सर्व लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी डीबीटीची अंमलबजावणी केली. यामुळे महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आली, भ्रष्टाचाराच्या संधी संपविण्यात आल्या व लाभार्थ्यांची फरफट थांबली, असेही निरीक्षण मोहोळ यांनी मांडले आहे.

संबंधित लेख